चिपळूण: चिपळूण हे जंक्शन रेल्वे स्टेशन आहे. दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. चिपळूण हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तेथील काही रेल्वेच्या गाड्या फलाट क्रमांक दोन वर थांबतात. यामुळे चिपळूणच्या रेल्वे स्टेशनवर तातडीने शेड वउभी करावी व स्वच्छालयही बांधण्यात यावे,अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत भाई यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
व ते पुढे म्हणाले की, फलाट क्रमांक दोन वर रेल्वे प्रवाशांना उन्हाळामध्ये उन्हात व पावसाळ्यामध्ये पावसात उभे रहावे लागते.यामुळे रेल्वे गाडी येईपर्यंत फलाट क्रमांक दोन वर थांबणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे व त्या ठिकाणी स्वच्छालयाची देखील व्यवस्था नसल्यामुळे फार मोठी अडचण निर्माण झाली आहे.
तरी यावर तातडीने निर्णय घेऊन वरील विषय मार्गी लावावे असेही श्री.मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला कळविले आहे.