लोटे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तर्फे सन्मानीय राज ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि संदीप हरि फडकले ( माजी खेड तालुका अध्यक्ष मनसे )यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील २५ जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत छत्र्या वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत आतापर्यंत वारकरी शिक्षण संस्था आंबडस,जिल्हा परिषद शाळा लवेल शिंदेवाडी,जिल्हा परिषद शाळा माणी,जिल्हा परिषद शाळा आयनी ढाकरवाडी,जिल्हा परिषद शाळा शेल्डी पायरवाडी,जिल्हा परिषद शाळा शेल्डी हेदवाडी,जिल्हा परिषद शाळा घेरारसाळगड,जिल्हा परिषद शाळा बोरघर,जिल्हा परिषद शाळा शेल्डी गावठण इत्यादी शाळांमध्ये छत्र्या वाटप कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले आहेत.उर्वरित शाळांमध्येही लवकरच छत्र्या वाटप करण्यात येणार असून,खेड तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमांच्या वेळी उपस्थित चंद्रकांत दादा राणे( कुणबी सेवा संघ लवेल मा. अध्यक्ष), हुसेन ठाकूर साहेब (असगणी माजी सरपंच),मनसेचे कार्यकर्ते अजय शिगवण,नवनाथ मायनाक,सुजल फडकले,प्रेम कांदेकर, प्रमोद बेलोसे, प्रशांत मंडलिक यांच्यासह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षकवर्ग, शिक्षण समिती अध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये आणि पावसाळ्यात त्यांना आवश्यक संरक्षण मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मा.तालुका अध्यक्ष संदीप हरि फडकले यांनी सांगितले.या उपक्रमाबद्दल पालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, मनसेच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
