लांजा (गोविंद चव्हाण) : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (केंद्र – लांजा, विभाग – रत्नागिरी) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जिजाऊची वारी पंढरीच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. निलेश भगवान सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांसाठी एसटी बसची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र-लांजा अध्यक्ष योगेश संतोष पांचाळ यांनी दिली.

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्याची इच्छा असलेल्या वारकरी भाविकांनी आपली नावे आगाऊ नोंदवावीत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील अनेक वारकरी भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र ही संस्था शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेचे कार्य करत असून, धार्मिक व सांस्कृतिक परंपरांच्या जतनासाठीही सातत्याने कार्यरत आहे.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

  • योगेश पांचाळ – 8999663079
  • अनिकेत जाधव – 7038832074
  • राकेश राऊत – 9082003091
  • लांजा कार्यालय – 8692893833
  • संदेश तोडणकर – 7506373499
  • सनी गुरव – 9307303122
  • संदिप गोबरे – 7738181919