लांजा (गोविंद चव्हाण) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवार १४ जुलै रोजी राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालये, आगारे आणि बसस्थानक परिसरात व्यापक वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले असून या पार्श्वभूमीवर लांजा आगारातही आज वृक्षारोपण करण्यात आले.यामध्ये आंबा,फणस, वढ,बावा,राताबी, आकेशी अशा झाडांचा समावेश आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हरित महाराष्ट्राच्या संकल्पाला बळकटी देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून मुख्य वृक्षारोपण कार्यक्रम विद्याविहार येथील मुंबई विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
एसटी महामंडळाने याबाबत सर्व विभागांना परिपत्रक जारी करून प्रत्येक बसस्थानक, आगार व विभागीय कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षारोपणानंतर त्यांच्या नियमित संगोपनाची जबाबदारी निश्चित करून हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता पर्यावरण संरक्षणाचा सातत्यपूर्ण संकल्प म्हणून राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर लांजा आगारातही वृक्षारोपण करण्यात आले असून सदर कार्यक्रम मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता लांजा आगार आणि बसस्थानकात करण्यात आले आगारप्रमुख काव्या पेडणेकर व एसटी कर्मचारी तसेच वनपाल धुलू कोलेकर वत्यांचे सहकारी सहभागी झाले.
