नवी दिल्ली : दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत पाठिंबा दिला आहे,आगामी २० तारखेला संसदेचे कामकाज सुरू होताच, आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी नवी दिल्ली येथे आंदोलनास्थळी बोलताना म्हटले आहे.

सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,आगामी २० तारखेला जेव्हा संसदेचे सत्र सुरू होईल, तेव्हा आम्ही हा संपूर्ण मुद्दा अत्यंत ताकदीने सभागृहात मांडू,या सर्व प्रश्नांना जबाबदार धरून आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी संसदेत करणार आहोत, असे सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सलग २० दिवस पूर्ण होत आहेत ,त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, हे केंद्र सरकार अतिशय असंवेदनशील आणि बधिर आहे. देशातील एक महत्त्वाचा व्यक्ती २० दिवस अन्नत्याग करून बसला आहे, मात्र सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधण्याची तसदी घेतलेली नाही. लोकशाहीत सरकारने किमान चर्चेसाठी तरी पुढे यायला हवे होते, पण त्यांनी जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे, असेही सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना स्पष्टपणे सांगितले आहे.

पुढे बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,तुमचा जीव आमच्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही उपोषण सोडावे, अशी विनंती केली. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि संपूर्ण ‘इंडिया’ आघाडी सोनम वांगचुक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून हा लढा आपण एकत्रितपणे संसदेत लढू,सोनम वांगचुक यांच्या मागण्या आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेतील गंभीर विषय या दोन्ही मुद्यांवर भारत सरकारने आता तातडीने लक्ष घालावे,वांगचुक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे सरकारला महागात पडू शकते, असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले आहे.