मुंबई – राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी पक्षातील सर्व मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, माजी आमदार तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पाहणी करण्याचे स्पष्ट व सक्त निर्देश दिले आहेत.
नैसर्गिक संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडू नका. त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घ्या, नुकसानग्रस्त भागांची पाहणी करा आणि आवश्यक प्रशासकीय मदत मिळवून देण्यासाठी तत्परतेने पाठपुरावा करा, अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी आज दिल्या.
“शेतकरी अडचणीत असताना आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या ऐका, त्यांना धीर द्या आणि शासनाच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे स्पष्ट निर्देशही दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ता हा शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत आहे, हा विश्वास शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले.
[12:19 pm, 23/09/2026] Sunil Salvi: राज्यातील बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर कर;लालबाग राजाच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे बळीराजासाठी साकडे
मुंबई दि. २३ सप्टेंबर – राज्यातील बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट दूर कर आणि त्यांच्या पिकांना मुबलक पाणी… त्यांच्या शेतात हिरवळ येऊन कष्टाला चांगले फळ मिळो व त्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस यावो असे साकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बळीराजासाठी लालबागच्या राजाच्या चरणी घातले.
राज्यात निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले.
विघ्नहर्त्या गणरायाने राज्यातील शेतकरी बांधवांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ द्यावे, राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, पिकांचे नुकसान टळावे आणि बळीराजाचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लालबागच्या राजाच्या चरणी केली.
