चिपळूण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असून त्यानिमित्ताने चिपळूण शहर मंडल तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे रक्तदान शिबिर अपरांत हॉस्पिटल भोगाळे चिपळूण येथे पार पडणार असून रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनी केले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रक्ताचा असणारा तुटवडा भरून काढण्यासाठी भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम घेण्यात आलेला आहे. यासाठी महिला मोर्चा अध्यक्ष रसिका देवळेकर युवा मोर्चा अध्यक्ष शुभम पिसे व या रक्तदान शिबिराचे संयोजक संदीप भिसे व सह संयोजक संगीता पालकर हे विशेष मेहनत घेत आहेत. तरी रक्तदात्यांनी आपली नावे त्वरित नोंदवून सहकार्य करावे.
About The Author
Related Posts
Recent Posts
- व्हेळ येथे ‘हसत-खेळत विज्ञान शिबिर’ उत्साहात संपन्न…
- आमदार शेखर निकम यांची वचनपूर्ती! वाणी आळी राम मंदिर सभागृहाचे भूमिपूजन संपन्न…
- सामाजिक कार्यकर्ते संदीप सासने यांना धर्मपालक पुरस्कार प्राप्त…
- चिपळूण नागरीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी यापुढेही जोमाने काम करू… अध्यक्ष सुभाषराव चव्हाण; पतसंस्थेचा वर्धापन दिन सोहळा जल्लोषात साजरा…
- देव्हारे केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांची मिलिंद ॲग्रो काजू युनिटला क्षेत्रभेट!…