चिपळूण : मतदार यादी विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) अभियानात राज्यात प्रथम ठरलेल्या चिपळूण विधानसभा मतदार संघाच्या यशाबद्दल उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे साहेब यांचे शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांनी अभिनंदन केले.

यावेळी चिपळूण तहसीलदार प्रविण लोकरे साहेब, नगर परिषद मुख्याधिकारी संजय जाधव साहेब, शिवसेना गटनेते अंकुश आवले, नगरसेवक विकी लवेकर, शिंदे साहेब, मेहेत्रे साहेब, उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते, मयूर फटकुरे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. चव्हाण साहेब यांनी प्रांताधिकारी यांचेसोबतच या अभियानामध्ये सहभागी असलेले संबंधित सर्व विभागाचे अधिकारी – कर्मचारी – बीएलओ, बीएलए यांच्याही कामाचे कौतुक करून अभिनंदन केले.