दिल्ली : दिल्ली येथील जंतर-मंतर तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आणि नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी व युवक सहभागी झाले होते. लोकशाही मार्गाने न्यायाची मागणी करणाऱ्या या आंदोलनानंतर अनेक विद्यार्थी व युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राजापूर तालुका शाखेच्या वतीने आज राजापूर तहसील कार्यालय तसेच राजापूर पोलीस स्टेशन येथे केंद्र शासन आणि महाराष्ट्र राज्य सरकारला उद्देशून निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी व युवकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशी ठाम मागणी या निवेदनातून करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, उपजिल्हाप्रमुख रविंद्र डोळस, विधानसभा संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, विधानसभा संघटक रामचंद्र सरवणकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार, उपतालुकाप्रमुख अनाजी गोटम, अभिजित तेली, उपनगराध्यक्ष विनय गुरव, माजी शहर प्रमुख अनिल कुडाळी, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष हातणकर, तालुका अधिकारी सुभाष नवाळे, शहर युवती प्रमुख प्रतीक्षा मांजरेकर, विभागप्रमुख रुपेश नारकर, विलास नारकर, नरेश शेलार, उपविभागप्रमुख नामदेव नागरेकर, रवी पैकडे, गणेश गिरकर, विठोबा हरयाण, प्रकाश डूकळे, अनंत कोलते, उपविभाग संपर्क प्रमुख विद्याधर पेडणेकर, दिवाकर मयेकर, मल्लू कोल्हे, विभाग संघटक मंदा शिवलकर, स्नेहा उगले, मिनाक्षी गुरव, उपशहर युवासेना पदाधिकारी गार्गी चिपटे, मनीषा वडके, गणपत मोंडे, शाखाप्रमुख संजय पेडणेकर, चंद्रकांत झापणेकर यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.