चिपळूण – संगमेश्वर मतदारसंघातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाबाबत आमदार शेखर निकम यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर साहेब यांची मुंबई येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या शिफारशींनुसार कामथे येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे २०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन, देवरुख व ट्रॉमा केअर सेंटरमधील सुविधा वाढविणे, रिक्त पदे भरणे, आवश्यक निधी उपलब्ध करून देणे तसेच प्रस्तावित विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी चिपळूण तालुक्यातील मौजे असुर्डे येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबतही चर्चा झाली. संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत मंत्री महोदयांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासीत केल्याची माहिती आमदार शेखर निकम यांनी दिली.
