रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील अंजणारी पुलावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि खासगी बस यांच्यात झालेल्या धडकेत भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत ३० प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली.
या अपघातातील जखमी प्रवाशांची रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींना वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, तसेच त्यांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
या दुर्घटनेतील सर्व जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
