लोटे : – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट मधील टी . ई. संगणक अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी ओम लाखन याने मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग-४ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन योगासन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
ही आंतरमहाविद्यालयीन योगासन स्पर्धा दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण येथे पार पडली. या स्पर्धेत ओम लाखनने आपल्या उत्कृष्ट योगासन कौशल्याचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळवला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याची आंतरविभागीय (Inter-Zonal) योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
ओम लाखनच्या या यशामुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट तसेच संगणक अभियांत्रिकी विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, उपप्राचार्य डॉ. सचिन पाटील, रजिस्ट्रार प्रा. संदीप मुंगटे, क्रीडा शिक्षक संजय बोले तसेच क्रीडा समितीचे अध्यक्ष प्रा. सचिन धवळे यांनी ओम लाखनचे अभिनंदन केले. तसेच आगामी आंतरविभागीय योगासन स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा देत उत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
ओम लाखनच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आंतरमहाविद्यालयीन योगासन स्पर्धेत जी. आय.टी.च्या ओम लाखन चे उल्लेखनीय यश…
