चिपळूण : तालुक्यात अवैध दारू, गांजा तसेच इतर अमली पदार्थांच्या वाढत्या विक्रीविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रविण राजाराम जाधव आक्रमक झाले असून 15 ऑगस्टपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना याबाबत निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात अवैध दारू व अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर राजरोस पणे सुरू असून संबंधित अवैध धंद्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी 28 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा उत्पादन शुल्क विभाग तसेच संबंधित प्रशासनाकडे निवेदन देऊन 15 ऑगस्टपर्यंत प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निर्धारित मुदतीत ठोस कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता प्रांताधिकारी कार्यालय, चिपळूण समोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे प्रविण जाधव यांनी स्पष्ट केले आहे. या निवेदनाची प्रत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना माहितीसाठी पाठविण्यात आली आहे.
तहसिलदार यांच्या अनुपस्थित पुरवठा अधिकारी अभिजीत महाडिक यांना निवेदन देताना प्रविण जाधव, उमेश पवार, प्रशांत मोहिते, उमेश सकपाळ, प्रशितोष कदम, विलास जाधव.