दापोली : मुख्यमंत्री बळीराजा पाणद रस्ते योजना समितीची दापोली मंडणगड संयुक्त बैठक नुकतीच दापोली उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात समीतीचे अध्यक्ष सन्मानिय किशोरभाई देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि दापोली उपविभागीय अधिकारी मा.श्री विजयकुमार सुर्यवंशी साहेब,दापोली तहसीलदार सौ आर्चनाताई बोंबे मॅडम,मंडणगड तहसीलदार श्री अक्षयजी ढाकणे,श्री शैलेशजी सणस डीवायएसपी, यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
बैठकीत योजनेचा उद्देश,निकष, तसेच योजनेंतर्गत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रात्प झालेले १६५ अर्ज यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला बळकटी देणा-या मुख्यमंत्री बळीराजा पाणद रस्ते योजनेचा उद्देश सफल करण्याच बैठकीत ठरविण्यात आले.
या बैठकीला दापोली, मंडणगड भूमिअभिलेख,पंचायत समीती,जिल्हापरिषद बांधकाम,कृषी,आदी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.