बारामती – बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने बारामती शहरामध्ये आधुनिक ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आले असून या चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी तसेच इलेक्ट्रिक वाहनधारकांना दर्जेदार आणि सुलभ चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. या चार्जिंग स्टेशनमुळे बारामती शहरातील तसेच परिसरातील ईव्ही वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून, हरित आणि शाश्वत विकासाला देखील हातभार लागणार आहे.
या उद्घाटनाच्या वेळी बाजार समितीचे पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.