लोटे : – राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने लोटे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष श्री अजिंक्य ( बाळू ) आंब्रे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात सोनगाव माठवाडीच्या गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिली, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव सुद्धा उपस्थित होते. केदारनाथ गोविंदा पथक सावर्डे यांनी यावेळी सात थरांची सलामी दिली. त्याचबरोबर मधली वाडी गोविंदा पथक घाणेखुंट ने सहा थरांची, श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिधाम गुरुकुल लोटे यांच्या गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिली तर कोंडफणसवणे येथील गोविंदा पथकाने सहा थरांची सलामी देऊन रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी एक विशेष उल्लेखनीय गोष्ट घडली.

रसिकांच्या, प्रेक्षकांच्या आणि गोविंदांच्या गर्दीत कोणा अज्ञात व्यक्तीची सुमारे पाच ते सहा हजारांची रक्कम श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोविंदा पथकाच्या एका लहान गोविंदाला मिळाली. आणि ती रक्कम त्याने गुरुकुलाचे संचालक श्री भगवान कोकरे महाराज यांच्या हस्ते आयोजकांकडे सुपूर्द केली व त्यांना विनंती केली की ही रक्कम ज्यांची असेल त्यांना सुखरूप पोहोचवा. या त्यांच्या कृत्यामुळे संपूर्ण रसिक प्रेक्षक आणि गोविंदा रसिक भारावून गेले आणि या गोविंदा पथकाचे कौतुक केले.यावेळी आलेल्या प्रत्येक गोविंदा पथकाला रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) च्या वतीने रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याशिवाय उपस्थित राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि गोविंदा रसिक यांच्याकडूनही वैयक्तिक पारितोषिकांची उधळण करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) चे जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अरविंद आंब्रे, आर के आंब्रे, राजेंद्र आंब्रे, सचिन (अप्पा) आंब्रे, समीर आंब्रे, भरत भेकरे, मंगेश महाडिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या दहीहंडी उत्सवाचा हजारो रसिकांनी आनंद घेतला.