चिपळूण : तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा बावशेवाडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व विश्व शांती बुद्ध विहार वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु, राजेंद्र नाना कांबळे होते प्रथम चिपळूण विभाग अध्यक्ष विलास सकपाळ गुरुजी यांच्या हस्ते धम्म ध्वज व कळंबस्ते सरपंच विकास गमरे यांच्या हस्ते निळा ध्वज फडकवण्यात आला . तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला सामाजिक कार्यकर्ते राजुभाई जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पवार व शाखा अध्यक्ष यांनी पुष्पहार अर्पण केला .दिपप्रज्वलन माजी नायब तहसीलदार उल्हासजी कदम, बौद्ध उपासक राजेंद्र जाधव, सिध्दार्थ जाधव , एस. के. जाधव यांनी केले. धम्म प्रवचन भिकू विमल बोधी यांनी केले या कार्यक्रमाला चिपळूण नगर परिषद नगर सेविका निलिमा जाधव, माजी विभाग अध्यक्ष सुनिलजी गमरे, माजी जिल्हापरिषद सद्स सौ. स्नेहल सुनिल गमरे, सुभेदार गमरे, सावंत,आधी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंरजन कांबळे यांनी केले.
