संगमेश्वर : श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्था, शृंगारपूर, तालुका संगमेश्वर येथे कुलस्वामिनी भैरीभवानी मूळ पीठ श्री शेत्र शृंगारपूर येथे श्री भैरी भवानी मंदिराचा वैशाख पौर्णिमा उत्सव 2026 वैशाख चतुर्दशी शुक्लपक्ष शके 1948 गुरुवार दि. 30 एप्रिल 2026 व वैशाख पौर्णिमा शुक्लपक्ष शके 1948 शुक्रवार दि. 1 मे 2026 या शुभ दिनी संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाबरोबर विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते त्याचबरोबर यानंतर समाज उन्नतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा संस्थानाचा मानस आहे. सदर दोन्ही दिवस येणाऱ्या सर्व भाविकांच्या चहा नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी सर्व भक्तगणांनी सदर दोन दिवशी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
