लांजा : लांजा,भांबेड येथील ह.भ.प. सोनू बाबा कुर्णेकर पायी दिंडी समाधी सोहळा या ठिकाणी श्रावण मास निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी लांजा राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघा चे आमदार किरण सामंत हे उपस्थित होते.या वेळी लांजा कोर्ले गावचे शाहीर काशिराम जाधव यांनी आपल्या गोड मधुर अमृत वाणीने शाहीरी पोवाडा सादर केला तो उपस्थित लोकांना प्रभावी पडला या गाण्यातून समाजाती वेदना संस्कृती इतिहास व परीवर्तनाची जोड यांच्या वाणीतून जागृत होते.
या कार्यक्रमाच्या वेळी कुर्णेकर पायी दिंडीचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.संतोष महाराज कुर्णेकर यांच्या समावेश आमदार किरण सामंत यांनी काशिराम जाधव यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी माजी शिक्षण सभापती जगदीश राजपकर उपस्थित होते.