
खेड : सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक संजय बुटाला तसेच खेड येथील प्रसिद्ध वकील सुधीर बुटाला यांचे वडील शरद दत्तात्रेय बुटाला (वय ९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बुटाला कुटुंबीयांसह नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे.
शरद दत्तात्रेय बुटाला यांची अंत्ययात्रा गुरुवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता खेड एसटी बसस्थानकासमोरील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.
त्यांच्या निधनाने बुटाला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.