खेड :- तालुक्यातील चाकाळे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शासकीय सेवेतील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी श्री दिपक भिकाजी मोहीते यांची बिनविरोध निवड झाली आहे .
हि बिनविरोध निवड दि. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत प्रशासक तथा सरपंच सौ. श्रध्दा जितेंद्र भिलारे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. यावेळी माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष सौ. अजित मोहीते, पोलीस पाटील विकास वाडकर, महेंद्र जाधव, अनिल जाधव, माजी उपसरपंच अक्षय गमरे, ग्रामसेवक श्रीमती वाजे-सावंत, आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
चाकाळे महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी दिपक मोहिते यांची बिनविरोध निवड !
