चिपळूण : चिपळूण तालुका वैश्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांची सन २०२५ -२६ या आर्थिक वर्षाची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. राजाराम (हेमंत) शिरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांचे उपस्थितीत पार पडली. सभेस उपस्थित सर्व सभासद व मान्यवरांचे संस्थेचे सेक्रेटरी श्री. निनाद देवळेकर यांनी स्वागत केले. अहवाल सालात संस्थेचे जे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांचे अहवाल सालात दुख:द निधन झाले आहे त्यांना आदरपूर्वक व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेतील अजेंड्यातील विषयांवर संस्थेचे सभासद श्री. विकास शेटये, सौ. राधिका पाथरे ,ॲड. दिलीप दळी, श्री मिलिंदशेठ कापडी, श्री.सुनील खेडेकर ,श्री.किशोर रेडीज यांनी चर्चेत भाग घेतला . तसेच संचालिका सौ. राधिका पाथरे यांनी संस्थेने सर्व प्रकारचे आवश्यक आदर्श प्रमाण योग्य राखले असून संस्थेने केलेल्या कामकाजाचा सादर केलेला अहवाल प्रगतीदर्शक असल्याचे नमूद केले व संस्थेच्या संचालक मंडळ व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पतसंस्थेस सन २०२५ -२६ या आर्थिक वर्षात रु. ८१ लाख २३ हजार ६९२ इतका नफा झाला असून त्या नफ्यातून संचालक मंडळाने सभासदांसाठी शिफारस केलेल्या १३% लाभांष वाटपास सभेत मंजुरी देण्यात आली.
संस्थेचे चेअरमन श्री. राजाराम (हेमंत) शिरगांवकर यांनी मनोगत व्यक्त करताना २०२५ -२६ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व प्रगतीदर्शिकेचा चढता आलेख विषद केला. तसेच संस्थेला सहकार्य केलेल्या सर्व सभासद, ठेवीदार, हितचिंतक, ग्राहक, संचालक मंडळ, कर्मचारी व पिग्मी एजंट यांचे कौतुक केले.
त्यानंतर संस्थेचे व्हा. चेअरमन श्री. तुषार सुर्यकांत रेडीज यांनी सर्व सभासदांचे ठेवीदार हितचिंतक व ग्राहकांचे आभार व्यक्त केले. चिपळूण वैश्य समाजाने सभेसाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल समाजाचे आभार मानले.
त्यांनतर पतसंस्थेच्या ज्या सभासदांची मुले सन २०२६ मध्ये १० वी, १२वी, पदवी, पदवीत्तर तसेच तालुका व जिल्हा स्तरावर अन्य परीक्षेत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला व चहापान झाल्यावर सभा संपल्याचे संस्थेचे सेक्रेटरी यांनी जाहीर केले.