चिपळूण : खेर्डी दत्तवाडी परिसरात महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा उद्योजक आणि दत्तवाडी मित्र मंडळाचे आधारस्तंभ अजिंक्यदादा पवार यांच्या पुढाकाराने दिनांक 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता खेर्डी दत्तवाडी, कलावती आई मंदिराशेजारील पल्लोड मैदान येथे हा कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री जानवी किल्लेकर प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे.महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खेर्डी आणि परिसरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,” असे आवाहन आयोजक अजिंक्यदादा पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे
