चिपळूण :- चिपळूण नगर परिषदेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौक चिंचनाका ते बहादूर शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा एक रस्ता आणि छत्रपती शिवाजी चौक चिंचनाका ते दैनिक सागरचे संपादक नानासाहेब जोशी मार्ग पावर हाऊस हे दोन रस्ते रुंदीकरणासाठी चिपळूण नगर परिषदेच्या प्रशासनाने २आणि ३ सप्टेंबर रोजी कार्यवाही करण्याची तयारी केलेली आहे. मात्र हे काम करताना नकाशातील रेखांकन लक्षात घेऊन रुंदीकरण करावे व कोणाची किती जागा रुंदीकरणात वापरण्यात येणार त्याची व्यवस्थित माहिती नागरिकांना द्यावी असे मत भाजप गटनेते शशिकांत मोदी यांनी प्रशासनाकडे मांडले आहे.
परंतु ही कारवाई सुरू करत असताना संबंधित जागा मालकांची नेमकी जागा किती जाते त्याची व्यवस्थित स्क्वेअर फुटामध्ये माहिती द्यावी तसेच त्यांना टीडीआर किंवा एफएसआय किती आपण देणार आहोत याचीही त्याच वेळेला त्यांना तोंडी माहिती देऊन तशा प्रकारचे पत्र पुढील आठ दिवसात संबंधित जागा मालकांना देणे बंधनकारक आहे. परंतु 7/12 वर एकापेक्षा अधिक जर नाव असतील तर नेमकं कोणाला किती टी डी आर द्यायचा यासंदर्भात त्या सर्व जागा मालकाने एकत्र येऊन बैठक घेऊन तसा निर्णय घ्यावा लागेल. गृहनिर्माण सोसायटी असेल तर सोसायटीच्या नावाने सदर एफएसआय किंवा टीडीआर चा पत्र देणे अपेक्षित आहे. हे सगळं होत असताना उजव्याकडचा रस्ता थोडा सरकवा डाव्याकडचा रस्ता थोडा सरकावा अशा प्रकारची मागणी होऊ शकते अशा वेळेला प्रशासनाने योग्य तो मध्यबिंदू अंतिम केल्यास कोणावर अन्याय होणार नाही. रस्त्याचे कामकाज होण्यास विलंब होणार नाही. या सर्व गोष्टीचा प्रशासनाने योग्यता अभ्यास करून योग्य ती देखील घेऊन रस्ता रुंदीकरणाची मोहीम सुरू करावी अन्यथा कुठले एका बाजूला अन्यथा नकाशे मध्ये नसलेला रस्ता किंवा नकाशामध्ये असलेलं रेखांकन किंवा चुकीचे असलेले रेखांकन डोळ्यासमोर न घेता चुकीच्या पद्धतीने नव्याने रेखांकन केल्यास रस्ता होण्यास विलंब होईल. तरी यासाठी प्रशासनाने योग्य ते मनुष्यबळ घेऊन योग्य ती कार्यवाही करावी हे करत असताना अधून मधून कोसळणारा पाऊस यामुळे विलंब होणार नाही तसेच मार्किंग व्यवस्थित दिसावे याचे योग्य ते नियोजन करून सदर रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे गट नेते शशिकांत मोदी यांनी नगरपालिका प्रशासन यांच्याकडे केली आहे. याबाबत नगर परिषद सभे मधेही याबाबत प्रशासनाला जाणीव करून दिली आहे.सदर कामकाज करत असताना कुठल्याही राजकीय पक्ष हस्तशेप होणार नाही याची काळजी ही प्रशासनाने घ्यावी असेही आवाहन श्री.मोदी यांनी शेवटी केले आहे.
