चिपळूण :- केअर हेल्थ विमा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल चिपळूण येथील विमा प्रतिनिधी सनी जागुष्टे यांचा युरोप हंगेरीतील बुडापेस्ट येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल पदक देऊन सत्कार करण्यात आला.

चिपळूण संगमेश्वर या तालुक्यात हेल्थ केअर विमा क्षेत्रातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी, उल्लेखनीय व्यवसायवृद्धी आणि कंपनीच्या प्रगतीतील मोलाचे योगदान याची दखल घेत त्यांचा हा गौरव करण्यात आला.

युरोपच्या भूमीवर मिळालेला हा सन्मान म्हणजे सनी जागुष्टे यांच्या मेहनतीला, जिद्दीला आणि यशस्वी वाटचालीला मिळालेली पावतीच आहे

हा क्षण त्यांच्या कारकिर्दीतील अविस्मरणीय आणि अभिमानास्पद ठेवा ठरला असून चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुराच आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सनी जागुष्टे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.