चिपळूण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पेठमाप परीट आळी येथे 8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून खास महिला व मुलींसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या मध्ये त्यांच्या साठी विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले . या कार्यक्रमाला परिसरातील जेष्ठ महिलांपासुन अगदी लहानांपर्यंत सर्वांनी भाग घेतला .या कार्यक्रमाला महिला वर्गासाठी खास पुरुष वर्गाने अल्पोपहाराची व्यवस्था केली होती . हा कार्यक्रम विठ्ठल रुक्मिणी मंदिर पेठमाप परीट आळी महिला मंडळ यांनी आयोजित केला होता.
चिपळूणच्या पेठमाप भागात महिला दिन साजरा..!
