चिपळूण -चिपळूण शहराचे सुप्रसिद्ध जाग्रुत श्रध्दास्थान श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्ट , चिपळूण विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही नवरात्र महोत्सव आश्विन शुध्द, प्रतिपदा रविवार दि . ११ ऑक्टोबर पासून आश्विन शुध्द दशमी ( दसरा ), मंगळवार दि . २० ऑक्टोंबर रोजी पर्यंत ग्रामदैवते श्री जुना कालभैरव मंदिर, श्री देव केदारेश्वर मंदिर ( वैश्यवसाहत ), श्री देवी ऐकवीरा मंदिर ( वडनाका ), श्री देवी भवानी मंदिर, श्री कात्रादेवी मंदिर ( श्री क्षेत्र गांधारेश्वर ) चिपळूण येथे विविध धार्मिक व सांस्क्रुतिक कार्यक्रमांच्या आयोजनाने पारंपरिकरित्या साजरा होत आहे .

त्यानिमित्त श्री ग्रामदेव जुना काळभैरव मंदिर, चिपळूण येथे आयोजित नवरात्र उत्सव कार्यक्रम पुढील प्रमाणे –

रविवार दि . ११ ऑक्टोबर रोजी सकाळी श्री देव घटी बसविणे ( नवरात्र उत्सव प्रारंभ ) श्री देव काळभैरव – श्री देवी जोगेश्वरी , श्री देव केदार – श्री देवी जाखमाता , श्री देवी ऐकविरा, श्री देवी भवानी , श्री कात्रादेवी यांची घटस्थापना , सायंकाळी ५ ते ७ श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( चिपळूण ) आणि रात्रौ १० ते १२ श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ ( ओझरवाडी ) ,चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

सोमवार दि . १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ भार्गवी स्तोत्र पठण महिला मंडळ (महालक्ष्मी रेसिडेन्सी – खेंड) चिपळूण प्रस्तुत जागर देवीचा,
रात्रौ १० ते १२ श्री कालभैरव प्रासादिक संगीत भजन मंडळ ( शंकरवाडी ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

मंगळवार दि . १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री जिव्हेश्वर प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( पेठमाप ) चिपळूण, रात्रौ १० ते १२ श्री नवयुवक प्रासादिक संगीत भजन मंडळ ( कांगणेवाडी/खेंड ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

बुधवार दि . १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ – श्री हनुमान प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( पाग ) चिपळूण, रात्रौ १० ते १२ श्री गांधारेश्वर प्रासादिक संगीत भजन मंडळ, ( शंकरवाडी ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

गुरुवार दि . १५ ऑक्टोबर रोजी ललितापंचमी सकाळी १० वाजता कुंकुमार्चन धार्मिक विधी सकाळी ११ वाजता कुमारिका पूजन ( सहभाग :- कन्याशाळा चिपळूण ) विद्यार्थीनीना शैक्षणिक साहित्य वाटप सकाळी १० ते १ सप्तशती पाठ वाचन सामुदायिक सहभाग – श्री कात्यायनी महिला मंडळ (चिपळूण) सायंकाळी ५ ते ७ – श्री देवी कालिकामाता प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( पेठमाप ) चिपळूण, रात्रौ ९ ते ११ – श्री तुकारामबुवा जोगले वारकरी संगीत भजन मंडळ ( शंकरवाडी ) चिपळूण रात्रौ ११ ते १ श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ ( पाग ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

शुक्रवार दि . १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री सिद्धि प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( पाग ) चिपळूण, रात्रौ ९ ते ११ श्री विश्वकेदार प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ ( पवारआळी ) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री देव हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ ( हेलेकर मारुती मंदिर – खेन्ड ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

शनिवार दि . १७ ऑक्टोबर रोजी उपवास सायंकाळी ५ ते ७ पारंपारिक भोंडला ( १९ वे वर्ष ) सादरकर्ते सहेली ग्रुप ( चिपळूण ) रात्रौ ९ ते ११ भोई समाज प्रासादिक संगीत भजन मंडळ ( खालची भोईवाडी ) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री देव विट्ठल प्रासादिक संगीत भजन मंडळ ( पांचमाडकर – खेन्ड ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

रविवार दि . १८ ऑक्टोबर रोजी सकाळी श्री देव घटी उठविणे श्री देव कालभैरव – श्री देवी जोगेश्वरी , श्री देव केदार – श्री देवी जाखमाता , श्री देवी एकवीरा. श्री देवी भवानी. श्री कात्रादेवी ( उत्थापन ), सकाळी १० ते १२ श्री लक्ष्मी नारायण महिला मंडळ ( चिपळूण ) प्रस्तुत श्री देवी स्तवन, श्री सूक्त पठण, स्तोत्र ,कवच, मंत्र जप ,आरती, सायंकाळी ५ ते ७ कै. वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज प्रस्तुत संगीत स्वरसुमननांजली अंतर्गत स्वरसखी ( महिलांचा विशेष सहभाग ), रात्रौ ९ ते ११ श्री माऊली प्रासादिक वारकरी संगीत भजन मंडळ ( पवार आळी ) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री श्रीराम आणि श्री मुरलीधर प्रासादिक संगीत भजन मंडळ ( वैश्यवसाहत ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

सोमवार दि . १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री श्रीराम प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( वैश्यवसाहत ) चिपळूण, रात्रौ ९ ते ११ श्री साई शंकर प्रासादिक संगीत भजन मंडळ ( वरची भोईवाडी ) चिपळूण, रात्रौ ११ ते १ श्री सुकाई देवी प्रासादिक संगीत भजन मंडळ ( पाग नाका ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

मंगळवार दि. २० ऑक्टोबर विजयादशमी ( दसरा ) दुपारी ३ वाजता श्रीं चे सीमोल्लंघन , सोने लुटण्यासाठी श्रीं ची सवाद्य सहित शाही मिरवणूक विशेष सहभाग श्री विघ्नहर्ता पुणेरी ढोल झाँज ध्वज लेझीम पथक त्यानंतर श्रीं चा दर्शन सोहळा , सायंकाळी ६ वाजता शिवकालीन युध्दकला सरिपट्टा खेळ सादरकर्ते श्री गणेश मित्र मंडळ ( गणेशवाडी / मतेवाडी ) रावतळे चिपळूण पुरस्कृत श्री काळभैरव सरिपट्टा ढोल झाँज ध्वज पथक आणि ओझरवाडी ग्रामस्थ मंडळ पुरस्कृत शिवध्वनी ढोल झाँज पथक ( ओझरवाडी ) चिपळूण यांचा कार्यक्रम होईल.

नवरात्र उत्सव कालावधीत नित्यनियमीत सकाळी श्रींची पूजा अर्चा , रात्रौ ७:३० वाजता धूपआरती नंतर श्री कालभैरव ध्यान , स्तोत्र, अष्टक, कवच पठण, रात्रौ ९ ते १ भजनादी कार्यक्रम नित्यनियमित होतील याची भाविकांनी नोंद घ्यावी.

भक्तगण नागरिकांनी नवरात्र उत्सवात श्रींच्या सेवाकार्याचा लाभ घ्यावा .असे आवाहन श्री ग्रामदेव जुना काळभैरव देवस्थान ट्रस्ट , चिपळूण तर्फे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री .किशोर शेट्ये , श्री .समीर शेट्ये , महाजन विश्वस्त ( सचिव ) श्री . पंकज कोळवणकर , कार्यकारी विश्वस्त श्री. चंद्रशेखर लाड, श्री .सुमन्ता शिंदे आणि नवरात्र उत्सव कमिटी अध्यक्ष श्री . सचिन कोळवणकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रका अन्वये करण्यात येत आहे.