चिपळूण : शहरातील महिला व युवतींसाठी फॅशनचे रेडिमेड कपडे, ड्रेस मटेरियल आणि आर्ट ज्वेलरीची खरेदी आता अधिक सोयीची होणार आहे. ‘चाफा बुटीक अँड आर्ट ज्वेलरी’ या नव्या व्यवसायाचा शुभारंभ रविवार,२३ ऑगस्ट, 2026 रोजी करण्यात येणार आहे.
चिपळूण शहरासह परिसरातील ग्राहकांना नव्या ट्रेंडमधील कपडे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
रविवार, २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ७.३० या वेळेत उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटनानिमित्त २३ ते ३० ऑगस्टदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी खास रक्षाबंधनाचे औचित्य साधून १५ टक्के विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे.
तसेच ऑगस्ट महिन्यात एकावेळी किमान 1,500 रुपयांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विशेष ऑफर कार्ड देण्यात येणार असून, त्याची वैधता संपूर्ण सप्टेंबर महिन्यासाठी राहणार असल्याचे निमंत्रणपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.
हे दालन सौ. स्वरा संकेत कुलकर्णी व परिवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत आहे. चिपळूणमधील गाळा क्रमांक ८, रामकृष्ण प्लाझा, केक ऑफ द के शेजारी, मार्कंडी या मध्यवर्ती ठिकाणी हे दालन सुरू होणार आहे.
या नव्या व्यवसायाच्या शुभारंभप्रसंगी चिपळूणकरांनी आवर्जून उपस्थित राहून स्वरा संकेत कुलकर्णी व परिवाराला शुभेच्छा आणि सदिच्छा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
चिपळूणमध्ये ‘चाफा ’ बुटीक अँड आर्ट ज्वेलरीचे रविवारी उद्घाटन…
