चिपळूण : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बहादूरशेख येथील पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करून अभिवादन केले.

यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंद्रथ खताते, शौकतभाई मुकादम, मिलिंद कापडी, सूर्यकांत खेतले, नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर, योगेश पवार, राजू जाधव, सुभाष जाधव, पूजा निकम, सतिश मोरे, रावी मोरे, रविना गुजर, अदिती देशपांडे, पूर्वा आयरे आदी उपस्थित होते.