दापोली : दापोली येथील गोपाळ कृष्ण पतसंस्था प्रकरणात सर्व संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने सर्व संचालकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात संचालकांच्या वतीने ऍडव्होकेट हर्षद बडबडे आणि ऍडव्होकेट सिद्धार्थ अजय मेहता सुधीर शरद बुटाला, श्रेयस सुधीर बुटाला यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
सुनावणी दरम्यान वकिलांनी न्यायालयात ठाम प्रतिपादन केले की सर्व संचालकांवर केवळ बनावट केस करण्यात आली आहे. संचालकांनी कोणताही गुन्हा केलेला नाही उलट संस्थेचीच फसवणूक कर्जदारांनी केली आहे. सर्व संचालकांनी दापोली पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे कर्जदारांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. तसेच मेहरबान दिवाणी न्यायालय दापोली येथे देखील संस्थेमार्फत फिर्याद दाखल करून वसुलीसाठी आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.
या संपूर्ण प्रकरणाबाबत सरकारी ऑडिटर यांनी सविस्तर रिपोर्ट तयार केला असून त्या रिपोर्टमध्ये देखील संचालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. हा युक्तिवाद ग्राह्य धरत माननीय मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचने सर्व संचालकांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावेळी ऍड. हर्षद बडबडे ऍड.सिद्धार्थ अजय मेहता सुधीर शरद बुटाला श्रेयस सुधीर बुटाला यांनी युक्तिवाद केला.
गोपाळ कृष्ण पतसंस्था दापोली प्रकरणात सर्व संचालकांना मोठा दिलासा…
