मुंबई : महाराष्ट्र लोकलेखा समितीचे अध्यक्ष व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार दिनांक ७ व ८ ऑक्टोबर रोजी दोन दिवस राज्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसात विजय वडेट्टीवार नागपूर, वर्धा, हिंगोली व जालना जिल्ह्यातील दुष्काळी भागाला भेट देऊन पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील. उद्या दिनांक ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी नागपुर येथून विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्याची सुरुवात बुधवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करणार आहेत, त्यानंतर आष्टी तालुक्यातील पाहणी करून हिंगोलीच्या सेलगाव तालुक्यातील पानकन्हेर गावातील दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्य़ांशी संवाद साधणार आहेत. गुरुवारी दिनांक ८ रोजी ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.