चिपळूण ः मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी येथे क्रांती दिन तसेच जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. रोहित जाधव सर व सर्व शिक्षक वृंद यांनी क्रांतीज्योत प्रज्वलित केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सई मते व कुमारी कावेरी घरवे या विद्यार्थिनींनी केले. कुमारी आराज्ञा संतोष कांबळे या विद्यार्थिनीने क्रांती दिना विषयी माहिती सांगितली व कुमारी कावेरी घरवे जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगितले.
क्रांती दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक वर्गाने या स्पर्धेमध्ये एक देशभक्तीपर गीत सादर केले. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांमधून भारताच्या स्वातंत्र्य लढ्?यातील क्रांतिकारकांचे योगदान, देशभक्ती, देशप्रेम या बाबी सादर झाल्या. संपूर्ण वातावरण देश प्रेमाने भारावून गेले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थ्यांनी आदिवासी वेशभूषेमध्ये सुंदर असे देशभक्तीपर गीत शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. मोहन पवार सर यांच्या मार्गदर्शनानुसार सादर केले.
गीत गायन स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता सहावी (भारत भू चे तराने), द्वितीय क्रमांक इयत्ता सातवी अ (घोषवाक्य आज एक), तृतीय क्रमांक इयत्ता सातवी ब (बलसागर भारत होवो) व इयत्ता पाचवी (वंदे मातरम) तील विद्यार्थ्यांनी पटकावला. तर मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक इयत्ता दहावी अ (सतरंगी रंगों सा), द्वितीय क्रमांक इयत्ता दहावी ब (जो मिट्टी के बेटे), तृतीय क्रमांक इयत्ता नववी अ (उधळीत शतकीरणा) तील विद्यार्थ्यांनी मिळवला. या स्पर्धेचे परीक्षण शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. समिधा डांगे मॅडम, सौ. मृणाली जाधव मॅडम, सौ. विद्या जाधव मॅडम व श्री. भैय्या पाटील सर यांनी केले.
दलवाई हायस्कूल मिरजोळी मध्ये क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन..
