चिपळूण : तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेअंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील कृषी कार्यानुभव कार्यक्रमाच्या माध्यमातून निवळी (ता. चिपळूण) येथे शेतकऱ्यांसाठी ‘आंबा दगडी कलम (Mango Stone Grafting)’ या विषयावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले.
शेतकऱ्यांना आंबा दगडी कलम तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, दर्जेदार व रोगमुक्त आंबा रोपांची निर्मिती करता यावी तसेच अधिक उत्पादनक्षम फळबागा उभारण्यासाठी आधुनिक कलम तंत्रज्ञानाचा अवलंब करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना दगडी कलम करण्याची योग्य वेळ, कोयीपासून तयार केलेल्या रूटस्टॉकची निवड, निरोगी मातृवृक्षावरील सायनची निवड, कलम बांधण्याची अचूक पद्धत तसेच कलमानंतर घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य पद्धतीने दगडी कलम केल्यास कलमाचे यशस्वी प्रमाण वाढते व दर्जेदार आंबा रोपे तयार होतात, असेही सांगण्यात आले.
प्रात्यक्षिकादरम्यान प्रत्यक्ष आंब्याच्या कोयीपासून तयार केलेल्या रोपांवर दगडी कलम करून दाखविण्यात आले. यामध्ये रूटस्टॉकची तयारी, सायनची निवड, कलम बांधण्याची पद्धत, पॉलिथिन टेपचा योग्य वापर तसेच कलमानंतर सावली, पाणी व संरक्षणाची व्यवस्था कशी करावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
हा उपक्रम प्राचार्य डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, उद्यानविद्या विभागाचे प्रमुख प्रा. रोशन मोहिरे तसेच कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
आंबा दगडी कलम तंत्रज्ञानामुळे दर्जेदार आंबा रोपांची निर्मिती कृषीकन्यांचा शेतकऱ्यांना मोलाचा संदेश..
