चिपळूण : नाशिक येथील एका कॉर्पोरेट कंपनीत हिंदू तरुणींच्या कथित शोषणाच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कॉर्पोरेट जिहाद आणि त्यामागील वास्तव या विषयावर विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम आज सोमवार, 8 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी आमदार डॉ. निलेश राणे, प्रखर हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या प्रीती राऊत आणि हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. या विषयावरील वास्तव, त्याची व्याप्ती आणि त्यावरील उपाययोजना याबाबत समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.