दापोली : दापोली तालुक्यातील चिखलगाव येथील उबाठा शाखाप्रमुख व गाव अध्यक्ष श्री. राजेश शिगवण यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वावर आणि मतदारसंघातील माझ्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शिंदे गटाचे शाखाप्रमुख श्री. योगेश रामाने, महिला संघटिका व माजी सदस्य सौ. संघवी शिगवण तसेच श्री. प्रकाश कापडी देखील उपस्थित होते. राज्यासह मतदारसंघात सुरू असलेल्या विकासाभिमुख कार्याला मिळणारा हा वाढता प्रतिसाद निश्चितच शिवसेना पक्षाला अधिक बळकटी देणारा आहे. यावेळी सर्व नव्या सहकाऱ्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.