रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील निसर्गरम्य इनाम पांगारी या छोट्याशा गावातील सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सुहास याने आपल्या बुद्धिमत्ता, चिकाटी आणि अविरत मेहनतीच्या जोरावर भारत सरकारच्या NPCIL(न्यूक्लिअर पाॅवर काॅर्पोरेषन आॅफ इंडिया) मध्ये वैज्ञानिक अधिकारी (SCIENTIFIC OFFICER) म्हणून निवड होण्याचा मान मिळवला आहे. संपूर्ण भारतातून विविध राज्यातील निवड झालेल्या 1440 विद्यार्थ्यांमधून जे 120 विद्यार्थी निवडले गेले त्यामध्ये सुहासची वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या अभिमानात भर घालणारे आहे.
सुहास याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इनाम पांगारी येथे झाले. या शाळेत श्री. निलेश खांडेकर व श्री. साळवी गुरूजी या शिक्षकांनी त्याचा शैक्षणिक पाया भक्कम करण्याचे मोलाचे कार्य केले. येथे शिक्षण घेत असतानाच त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक सर्वांच्या लक्षात आली. इयत्ता पाचवीला विश्राम रामजी घोले हायस्कूल वाकवली येथे प्रवेश घेतल्यानंतर गुणवत्तेच्या बळावर त्याची जवाहर नवोदय विद्यालय राजापूर येथे निवड झाली, पंरंतु तिथे त्याचे मन न रमल्यामुळे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने आपल्या मामाच्या गावी माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा निवे-बुद्रक येथे पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता अकरावी गोगटे जोगळेकर रत्नागिरी येथे पूर्ण केल्यानंतर इयत्ता बारावीचे शिक्षण श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर काॅलेज खेड येथे प्रथम क्रमांकाने पूर्ण केले. पुढे घरडा इन्स्टयुटयुट आॅफ टेक्नोलाॅजीमध्ये प्रथम क्रमांकाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण 2019 साली यशस्विरित्या पूर्ण केले. प्रत्येक टप्प्यावर त्याने मेहनत, सातत्य आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली.
आपल्या बुद्धिवर आणि मेहनतीवर विश्वास असल्याने त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सुरूवात केली. कठीण समजली जाणारी GATE (ग्रॅज्युएट अॅप्टयुटयुट टेस्ट इन) ही परीक्षा तो तब्बल तीन वेळा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. पुढे त्याने ISRO (इंडियन स्पेस रिसर्च आॅरगेनायझेशन ), BARC (भाभा अनुसंशोधन केंद्र), HPCL (हिंदुस्तान पेट्रालियम काॅर्पोरेशन लिमिटेड), RRBJE (रेल्वे रिफ्रुटमेंट ज्युनिअर इंजिनिअर), IOCL (इंडियन आॅईल काॅर्पोरेशन लिमिटेड), DRDO(डिफेन्ड आॅफ रिसर्च आॅरगेनायझेशन), BMC ( बृहन्मंुबई मुन्सीपल काॅर्पोरेशन ) अशा अनेक परीक्षांमध्ये कठोर मेहनत घेतली. मुलाखतीपर्यत निवड होऊनही यश सतत हुलकावणी देत राहिले, परंतु त्याने अखेरपर्यंत हार मानली नाही पुढचा पर्याय म्हणून 2025 मध्ये IIT मंुबई येथे MTech साठी प्रवेश घेतला व हे शिक्षण घेत असतानाच त्याची NPCIL(न्यूक्लिअर पाॅवर काॅर्पोरेशन आॅफ इंडिया) मध्ये वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाली.
दापोली तालुक्यातील इनाम पांगारीचा सुपुत्र सुहास सुनिल दिवाळे बनला वैज्ञानिक अधिकारी…
