पोलादपूर : येत्या 9 ऑगस्टला माणगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन अध्यक्ष राजसाहेब ठाकरे करणार असून यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या माणगाव येथील बायपास रोडच्या कामाची पाहणी देखील राजसाहेब करतील, अशी माहिती मनसेचे राज्य प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी येथे दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान प्रवक्ते संदीप देशपांडे, पालघर ठाणे जिल्हा नेते अविनाश जाधव, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष राज पार्टे, राजेश येरूणकर, तालुका अध्यक्ष निलेश कोळसकर व अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदींनी विद्यार्थ्यांना माफ केले तसेच विद्यार्थ्यांना खिळे मारलेल्या लाठीने मारहाण करणाऱ्या पोलिसांना देखील माफ केले काय?असा प्रतिसवाल राज्य प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला.