दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघातील ३२ गाव विभागात माजी मंत्री शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि त्यांचे चिरंजीव आमदार नाम.योगेशदादा कदम यांचा प्रभाव कायम असून येथील जनतेचा त्यांच्यावरील विश्वास अढळ आहे. १९९० च्या दशकापासून या विभागात रामदासभाईंच्या नेतृत्वखाली मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. मुस्लिम आणि कुणबी समाजासहित तळागाळातील सर्व घटकला नेहमी न्याय देणारे रामदासभाई हे कोकणातील एकमेव नेते आहेत,असे ठाम प्रतिपादन उन्हवरे 32 गाव विभागातील कात्रण येथील सामाजिक कार्यकर्ते फरमानशठे बटे यांनी केले आहे.दैनिक सागरशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.

​पुढे बोलताना फरमानशठे बटे म्हणाले की, १९९० पासून रामदासभाईंनी खेड नगरपरिषद असो वा पंचायत समिती, सर्वच स्तरावर मुस्लिम समाजाला मान सन्मान आणि महत्त्वाची पदे देऊन योग्य न्याय दिला आहे. जाफर सुर्वे, सिकंदर जसनायिक,मन्सूर नाडकर यांच्यासारख्या नेत्यांना मोठी पदे देऊन त्यांनी समाजाप्रती असलेले प्रेम सिद्ध केले आहे. नगरपालिकांच्या निवडणुकीतही मुस्लिम समाजाच्या उमेदवारांना निवडून आणण्यात भाइंचे योगदान नाकारून चालणार नाही.निवडणुका आल्या की, कोणत्यातरी तोडक्या मोडक्या व्हिडीओ क्लीप बनवायच्या आणी रामदासभाईं मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्याचे भासवायचे आणी त्यांना बदनाम करण्याचा खोटा प्रयत्न करायचा असा डाव विरोधक करत असतात.पण मुस्लिम समाज आणी रामदास भाई यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत.आणी रामदास भाईंनी कोकणातील मुस्लिम समाजाला वेळोवेळी दिलेला न्याय डोळ्यासमोर असल्याने मुस्लिम समाज हा रामदासभाईंवर कायम विश्वास ठेऊन आहे. आणी तो विश्वास रामदासभाई सार्थकीही लावत असल्याचे बटे यांनी यावेळी सांगितले.

रामदासभाईच्या विकासाचा वारसा योगेशदादांच्या रूपाने पुढे २०१९ पासून आमदार योगेशदादा कदम यांनी रामदासभाईंच्या पावलावर पाऊल ठेवून दापोली,मंडणगड, खेडसह ३२ गाव विभागात विकासाचा डोंगर उभा करत पुढे नेला आहे.दापोली मतदार संघाचा सर्वांगीण विकास हे व्हिजन डोळ्यासमोर ठेऊन आज कोट्यावढी रुपयांची कामे शहरासहित खेडोपाड्यात होताना दिसत आहेत.पर्यटन, बचतगत, रोजगार निर्मिती यावर त्यांनी प्रामुख्याने भर दिला आहे असे सांगत आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाच प्रमुख खत्यांच्या मंत्रिपदाची जबाबदारी असताना देखील नाम. योगेशदादा कदम हे मतदार संघात सुख-दुःखाच्या प्रसंगी स्वतः उपस्थित राहून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करत आहेत. त्यामुळे ३२ गाव विभागातील तब्बल ९० टक्के जनता रामदासभाई आणि योगेशदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,असे बटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

विकासाच्या माध्यमातून नामदार योगेश कदम यांचे हात बळकट करण्यासाठी आता जिल्हा परिषद सदस्य श्री.प्रभाकर गोलांबडे कोळबांद्रे पंचायत समिती गणातुन सदस्या सौ.ममता शिंदे पांगरी तर्फे हवेली पंचायत समिती गणातुन सदस्य श्री.नरेश घरटकर यांना 32 गावातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले आहे.आपण त्यांच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून आपल्या समस्या सोडवाव्यात.तसेच एक सामाजिक कार्यकर्ता, शिवसेना पक्षाचा सदस्य म्हणून मीही आपल्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत यापुढेही 32 गावचा अधिकचा विकास साधायचा असेल तर,कोणीही विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता विकासाची घोडदौड सुरू असलेल्या पर्वात सर्वांनी सामील व्हावे असे आवाहनही फर्मान बटे यांनी केले.