खेड : येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचालित श्रीमान चंदुलालशेठ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये शनिवार दि. 3 ऑक्टोबर 2026 रोजी
झालेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या नाट्य स्पर्धेत उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून कुमारी दिव्या सुधीर जोगळे हिच्या आई, पृथ्वी, या भूमिकेला गौरविण्यात आले,
या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण आठ शाळांनी सहभाग घेतला होता. महासागरांचे पुनरुज्जीवन यावर आधारित विज्ञान नाटिका “हॅशटॅग आईसाठी”,या नाटिकेच्या माध्यमातून, महासागराचे होणारे प्रदूषण, त्याचे सजीव सृष्टीवर होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना, या सामाजिक विषयांवर आधारित विज्ञान नाटिका सादर करण्यात आली . या नाटिकेतील सहभागी कलाकारांनी संपूर्ण सभागृहातील प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कलागुणांनी अधिराज्य गाजवत सर्वांची मने जिंकली.
या यशस्वी नाटिकेचे लेखन प्रा. सौ अनघा कोलगे/ तोडकरी यांनी केले, तर अनघा कोलगे, सौ हेमा आंबुर्ले व सौ. मुग्धा बेलोसे, श्री स्वप्निल वनारे, श्री राकेश देवरुखकर, सौ प्रियांका नाईक, यांनी नाटिकेचे दिग्दर्शन केले , तसेच टेक्नोसेवी म्हणून शिंदे, श्री पणदेरे शिपाई ,वैदेही निकम यांनी काम पाहिले, या नाटिकेसाठी संस्था,शाळेचे प्र. मुख्याध्यापक श्री धोत्रे, पर्यवेक्षक श्री कांबळे, आणि शाळेतील सर्व शिक्षकांचे , शिक्षकेतर कर्मचा-यांचे बहुमोल असे सहकार्य लाभले . या नाटिकेमध्ये कुमारी दिव्या जोगळे, कुमार प्रणव बेलोसे, कुमारी संबोधी जाधव, कुमारी यशस्वी चव्हाण, कुमारी आर्या चव्हाण, कुमारी गार्गी मोरे, कुमार सोहम माने, कुमार ओम मोरे या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे नाटिकेला विशेष दाद मिळाली. तसेच सहकलाकार म्हणून कुमारी शाल्मली तांबडे, कुमार वेदांत माळी, कुमार वेदांत पदुमले, कुमार सार्थक पवार, कुमारी जान्हवी दयाळकर यांचे सहकार्य लाभले
विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व सर्व संबंधितांचे प्रशाला व संस्थे तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.