खेड : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प – खेड, बीट आंबवली अंतर्गत तालुक्यातील किंजळे तर्फे खेड येथे नववा राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम व सेवा संकल्प अभियान हा ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या अभियानाच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सौ.प्रिती पवार पर्यवेक्षिका यांच्यामार्फत देण्यात आली.यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना,तसेच बेबी केअर किट वाटप , आदी योजनांची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. तसेच मातृवंदना योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थीचे सत्कार करण्यात आला.
आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. रांगोळी प्रदर्शन व पाककृती प्रदर्शन करून जनजागृती करण्यात आली. तसेच ई आकार च्या श्रीमती. साक्षी भांगे यांनी आकार उपक्रम, नवचेतना उपक्रम , ऑनलाईन उपक्रम माहिती भरणेबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाला किंजळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ऋषिकेश मोरे , ग्रामपंचायत सदस्य सौ.श्रुतिका चव्हाण , माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.दर्शना मोरे , माजी आर्मी सैनिक चंद्रकांत पवार ,किंजळे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.धूम , किंजळे हायस्कूल शिक्षक श्री. मुजावर , आरोग्य सेविका शुभांगी वणे, आरोग्यसेवक दिपक मोहिते , शिपाई दगडू जाधव व संतोष मोरे दादा आणि गावातील महिला,अंगणवाडी सेविका, मदतनीस, हायस्कूलचे विद्यार्थी,अंगणवाडी लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ. माधवी यादव यांनी केले.