चिपळूण : व्हिजन थ्री न्यूजच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित आयोजित करण्यात आलेला लोकप्रेरणा गौरव पुरस्कार सोहळा २०२६ आणि संपादक श्री, राजेंद्रकुमार शिंदे यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी सह दुय्यम निबंधक वर्ग २ श्रीमती स्मिता गुरनुले, ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम, मा.शिक्षण विस्तार अधिकारी श्री .रमाकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्चलनाने आणि मातृपूजनाने झाली, यावेळी राजेंद्रकुमार शिंदे यांच्या मातोश्री आणि सासूबाई यांचे शिंदे पतीपत्नी यांनी व्यासपीठावर पाद्य पूजन केले. यावेळी उपस्थित सर्वजण या नाविन्यपूर्ण आणि हदयस्पर्शी सुरवातीने भारावून गेले.
श्री. राजेंदकुमार शिंदे यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये दहा वर्षांच्या व्हिजन थ्री न्यूजच्या वाटचालीसह पन्नास वर्षांच्या आयुष्याचा थोडक्यात आढावा घेऊन सर्वांप्रती कतज्ञता व्यक्त केली, यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. श्री.शिंदे यांना सुखदुखात कायम साथ देणा-या त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.ऋतुजा शिंदे यांचाही विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
पुरस्कारार्थी श्री .महादेव दत्ताराम चव्हाण यांना लोकप्रेरणा जनसेवा गौरव पुरस्कार, श्री भास्कर रामचंद्र कदम यांना लोकप्रेरणा ज्ञानरत्न पुरस्कार, श्री. प्रमोद शंकर ठसाळे यांना लोकप्रेरणा प्रशासकीय रत्न पुरस्कार , श्री. प्रकाश अनंत गांधी यांना लोकप्रेरणा सामाजिक सेवा गौरव पुरस्कार , श्री. नयनिश रमेश गुढेकर यांना लोकप्रेरणा पक्षीमित्र गौरव पुरस्कार, श्री. सतीश रजनीकांत जाधव यांना लोकप्रेरणा मनोदीप ज्ञानगौरव पुरस्कार , श्री. विलास दत्ताराम महाडिक यांना लोकप्रेरणा कोकण गौरव पुरस्कार, श्री. मकरंद माधव भागवत यांना लोकप्रेरणा निर्भीड लेखणी गौरव पुरस्कार, श्रीमती रंजिता विजय ओतारी यांना लोकप्रेरणा नारी शक्ती गौरव पुरस्कार ,श्री. अनिकेत सुधीर जाधव यांना लोकप्रेरणा युवा गौरव पुरस्कार मोठ्या जल्लोषात प्रदान करण्यात आला, सह दुय्यम् निबंधक स्मिता गुरनुले यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक करुन राजेंदकुमार शिंदे यांच्यासह सर्व पुरस्कारार्थीचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ पत्रकार सतीश कदम यांनी शिंदे यांच्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा उल्लेख करुन एकत्रितपणे केलेल्या कामाची माहिती दिली. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.रमाकांत पवार यांनीही शिंदे यांचे विशेष कौतक करीत त्यांना पढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यकमासाठी खास उपस्थित असलेल्या रत्नागिरी आकाशवाणीच्या रेडीओ सखी आणि नाट्य कलाकार सौ.पल्लवी गोडसे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला, कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये कार्यक्रमाचे कौतुक करुन वर्धापन दिनाच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
