चिपळूण: येथील भाजपाच्या अभ्यासू नगरसेविका ,सभापती आणि भाजप महिला मोर्चा चिपळूणच्या शहराध्यक्षा सौ. रसिका देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष शितल रानडे आणि सर्व महिला कार्यकर्त्यांनी नारीशक्ती वंदन अधिनियमाला समर्थन देण्यासाठी चिपळूणमध्ये व्यापक स्वरूपात अभियान सुरू केले आहे.

या अभियानांतर्गत विविध पक्षातील महिलांच्या गाठीभेटी घेऊन नारीशक्ती वंदन अधिनियमाला त्यांचे समर्थन आणि पाठिंबा घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर १६ एप्रिलला रत्नागिरी रॅली असून १८ एप्रिलला बोर्डवर सह्यांची मोहीम राबविली जाणार आहे. १८ एप्रिलला संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधेयक मांडणार आहेत.

चिपळूणमध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या प्रमाणावर महिला भगिनींचे समर्थन मिळत आहे अशी माहिती सभापती रसिका देवळेकर यांनी दिली.