चिपळूण (विशेष प्रतिनिधी) : चिपळूणच्या वाशिष्टी नदीचा १० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्यात येणार असून त्याकरिता नाम फाऊंडेशनसोबत ३१ रुपये प्रति क्युबिक मीटरने करार करण्यात आला आहे अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण येथे पत्रकारांना दिली.

ते पुढे म्हणाले की,जिल्ह्यातील छोट्या नद्यांच्या खोलीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तसेच खेड ते राजापूर नदीपात्रात वॉटर स्पोर्ट्स आणि बोटिंग सुरू करून पर्यटनाला चालना दिली जाणार आहे.
*रत्नागिरी शहरात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना विशेष ‘वॉटर सेव्हिंग नॉब’ बसवण्याचा अभिनव प्रयोग.राबविण्यात येणार आहे.अशी माहिती त्यांनी दिली.

अजित पवारांच्या अपघातावर राजकारण करणे दुर्दैवी असून विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे दिले आदेश असेही ना.सामंत यांनी स्पष्ट केले.