खेड (प्रतिनिधी) : – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य, मोरवंडे-बोरज येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ व २०२४-२५ मधील विज्ञान व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा १३ वा व १४ वा पदवी प्रदान समारंभ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठ मानव्यशास्त्र विभागाचे डिन डॉ. अनिल सिंग तर विशेष अतिथी म्हणून रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय अनंत कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजोग जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. उमेशकुमार बागल यांनी तर विशेष अतिथींचा परिचय महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढ्ढा यांनी करून दिला.