मंडणगड : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मिक परहर होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, प्रा. महादेव वाघ, प्रा. प्राची कदम, प्रा. साई पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी प्रा. महादेव वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.वाल्मिक परहर म्हणाले की. विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर सकस अहार व योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे. या दिवसाचे महत्व म्हणून विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारणे, विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंदी व अरोग्यदायी महाविद्यालयीन वातावरण उपलब्ध करुन देणे तसेच मानसिक आरोग्याप्रती सहानुभूती आणि वचनबदतेला प्रोत्साहन देण्यासाठी या काय्रक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अवेळी जेवन, फास्टफुडचे सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनामध्ये आपली जीवनशैली बदललेली आहे. याकरिता वेळीच आपण सर्वांनी जागृत होवून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व निरोगी जीवन जगावे असे सांगितले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिवसा’निमित्त प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले.
कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. महादेव वाघ यांनी तर शेवटी उपस्थित सर्वांचे आभार प्रा. प्राची कदम यांनी मानले.
इदाते महाविद्यालयात ‘मानसिक आरोग्य जनजागृती’कार्यक्रम संपन्न…
