मुरुड जंजिरा (सुधीर नाझरे ) : मुरुड येथील सुप्रसिद्ध जंजिरा व पदामदुर्ग किल्ला पाहण्यासाठी लाखो पर्यटक हजेरी लावतात .जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी ३ ठिकाणहून बोटींची जनवाहतूक होते .१ राजपुरी जेटीवरून ,२ खोरा बंदर ,३ दिघी जेटीवरून येथून पर्यटन बोटीने किल्ल्यात दाखल होतात .एक सोबत १००० पर्यटक किल्ल्याच्या प्रवेश द्वारावर उतरणे कठीण होते ,गर्दीमुळे पर्यटकांना बोटीचं बसावे लागते .नूतन जेटीवर २००० हजार पर्यटक जटीवर उभे राहणायची सोय असल्याने पर्यटकांसाठी हा प्रवास सुखकर आहे .परंतु जेटी पूर्ण होऊन १० महिने झाले पर्यटकांसाठी खुली होत नसल्याने पर्यटक व बोट धारक नाराज आहेत.
मुरुड राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पर्यटकांनसाठी मुख्य आकर्षण आहे.हा किल्ल्या समुद्रात असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी शिडाच्या बोटीने जावे लागते परंतु किल्लांच्या प्रवेश व्दारावर समुद्राच्या लाटांचा मारा कधी कधी जास्त होत असल्याने बोट चालकांना बोट लावते वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्याबरोबर पर्यटकांना ही बोटीतून उतरताना मोठे कठीण जायचे काहीजण पर्यटक उतरताना पडुन जखमी होऊ लागल्याने किल्ल्यावर अद्यावत जेट्टी असावी अशी मागणी सर्वंचस्थारावर होऊ लागल्याने राज्य शासनाने सागरमाला योजनेंतर्गत ९३.५६ कोटी खर्चून अद्यावत जेट्टीला मान्यता सप्टेंबर २०२२ दिली होती. त्या जेटीचे काम २०२५ ला पूर्ण झाले उद्घटनचा मुहूर्त मिळत नाही
मेरीटाईम बोर्डाचे उप अभियंता प्रविण पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की हा प्रकल्प सागरमाला अंतर्गत येत असल्याने झालेल्या कामाचा ऑडिट रिपोर्ट मुंबई कार्यातल्यातून मिळण्यासाठी पाठवण्यात आला आहे . आमचे काम पूर्ण झाले आहे उदघाटन लवकर होण्यासाठी पर्यतं सुरु आहेत
पर्यटक हितेंद्र पंड्या
आम्ही सर्व कुटुंब घेऊन जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येतो परंतु तिकीट काढायला रांगा पाहून वाईट वाटते ,जर नूतन जेटी सुरु झाली तर एप्रिल व मे महिन्यात येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास सुखकर होणार आहे