चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना नेते आणि गुहागर मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख श्री. विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.
याआधी आम्ही अन्य पक्षाचे काम करत होतो. परंतु सत्तेत असतानाही आमच्या वाडीचा विकास त्यांच्याकडून होऊ शकला नाही. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार असतानादेखील तुमच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेला विकासकामांचा धडाका पाहून आम्ही प्रभावित झालो आणि आमच्या वाडीने एकसंघपणे आपल्या सोबत येण्याचा निर्णय घेतला. यापुढे आपल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी कायम राहू, असे उद्गार प्रवेशकर्त्यांनी काढले. या सर्वांचे पक्षात स्वागत करताना आमदार श्री. जाधव यांनी आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द दिला.
यावेळी तालुकाप्रमुख श्री. सुभाष जाधव, उपतालुकाप्रमुख श्री. संदीप चव्हाण, लक्ष्मण कोकमकर, उमरोली विभागप्रमुख श्री. संदीप घाग, पंचायत समिती सदस्य श्री. गौरव पाटेकर, सौ. सुप्रिया वंजारे यांच्यासह या विभागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
