खेड :- तालुक्यातील कोरेगाव – तवकलीचा माळ येथील संतोष शंकर पवार (५७) यांचा शनिवार दिनांक ११ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात मृत्यु झाला. याची खबर मयताचे भाऊ सुभाष शंकर पवार यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.
मयत संतोष शंकर पवार हा खबर देणार यांचा भाऊ असुन, मयत भावाची अचानक तब्येत बिघडल्याने कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले, तेथून रुग्णवाहीकेने कळबणी बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करता त्याला मृत घोषित केले. अशी माहीती पोलीसांनी दिली.