खेर्डी : महिलांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि दैनंदिन धावपळीच्या जीवनातून काही क्षण विरंगुळ्याचे मिळावेत, या उद्देशाने धर्मवीर युवा प्रतिष्ठान आणि शिवसेना महिला आघाडी, खेर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी खास ‘खेळ पैठणीचा’ अर्थात ‘होम मिनिस्टर’ या मनोरंजक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता खेर्डी येथील खतातेवाडी परिसरातील हरिपरायण ग्राउंड येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ, धमाल-मस्ती, आकर्षक बक्षिसे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासोबतच त्यांच्या भेटीगाठींतून आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या आनंदसोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.