चिपळूण : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) सावर्डे येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या “SIMRS डिजिटल नेक्सस” या डिजिटल हॉलचा भव्य उद्घाटन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
या सोहळ्याचे उद्घाटन सौ. पूजा शेखर निकम (जिल्हा परिषद सदस्या, सावर्डे) श्रीफळ वाढवून व श्री. प्रशांत गोविंदराव निकम (उपाध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था), श्री. अनिरुद्ध निकम (कार्याध्यक्ष) श्री. मारुतीराव घाग (संचालक) यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
​हा डिजिटल हॉल चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे माननीय आमदार शेखरजी निकम (अध्यक्ष, सह्याद्री शिक्षण संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत पूर्ण होऊन कार्यान्वित झाला.
​याप्रसंगी बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांनी शिक्षण क्षेत्रातील आधुनिक बदलांवर भर दिला. सह्याद्री एमबीएचे हे आधुनिकतेच्या दिशेने पडलेले अजून एक महत्त्वाचे पाऊल आहे. भविष्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि डिझिटल सुविधांचा जास्तीत जास्त वापर करून आपले ज्ञान समृद्ध करावे,” असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

​या कार्यक्रमाला संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, संचालक शांताराम खानविलकर, संचालक गुलाब सुर्वे, संचालक हरिश्चंद्र सुर्वे, मुक्ता निकम शिंदे, सई निकम सुर्वे, सिद्धार्थ निकम यांच्यासह विविध विभागांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एमबीएचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व घटकांनी विशेष परिश्रम घेतले.